15 शेतकऱ्यांसाठी आगामी वर्ष समृद्धीचे : कृषी तंत्रज्ञान महोत्सवात हवामानतज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

शेतकऱ्यांसाठी आगामी वर्ष समृद्धीचे : कृषी तंत्रज्ञान महोत्सवात हवामानतज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज


“मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात पूर्वेकडून मान्सून दाखल होत असल्याने नांदेड जिल्हात अधिक पाऊस होत आहे. त्यामुळे जमिनीची पाणी पातळी पण वाढत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संगोपन पण तेवढेच महत्वाचे आहे. त्याचबरोबर या वर्षात महाराष्ट्रात सर्वदूर उत्तम पर्जन्यमान आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेत पिक घेतल्यास अधिक लाभ होईल.” असे विचार प्रसिद्ध हवामानतज्ञ श्री. पंजाबराव डख यांनी काढले. संस्थेतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी तंत्रज्ञान महोत्सव २०२३ उद्घाटनप्रसंगी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व.ना.कृ.विद्यापीठ संचालक विस्तार शिक्षण श्री. देवराव देवसरकर, नांदेड कृषी अधिकारी (आत्मा प्रकल्प संचालक) श्री. रविशंकर चलवदे, नाबार्ड जिल्हा विकास अधिकारी श्री. दिलीप दमय्यावार व संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते. या महोत्सवात मांडण्यात आलेल्या अनेक कृषी कंपन्याचे निविष्ठा, रोपे, शेती अवजारे प्रदर्शन, ड्रोन द्वारे फारावणी प्रात्यक्षिक व महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ विक्री यांची शेकडो शेतकऱ्यांनी माहिती घेतली.

मा. श्री. चलवदे यांनी गटशेती मधून अधिक लाभ असल्याने त्यावर लक्ष देण्याचे सांगत सबसिडीच्या मागे लागून आपली पत न घालवण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यासाठी विविध वैयक्तिक व समुहासाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली. तर श्री. देवसरकर यांनी जमिनीची प्रत पाहून पिके निवडावी व शेतीमालावर प्रक्रिया करून अधिक आर्थिक प्रगती होत असल्याने शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे सांगितले.
मा. श्री. दिलीप दमय्यावार यांनी पिक व पाणी याचे गणित घालून हवामानाधारित शेती करण्याचे सूचित केले. यावर्षी आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे होत असल्याने आपल्या आहारात ज्वारी, बाजरी आदी धान्याचा अधिकाधिक वापर करण्याची त्यांनी विनंती केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रमोद देशमुख यांनी आहार, शेती आणि उन्नती याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांनी करावे यासाठी संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला व मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. #NABARD #KrushiVed2023 #kvksagroli #nanded #agriculture #rural #SHG #climatechange #ClimateSmartAgriculture 















Comments

Popular posts from this blog