Posts

महोत्सवातील -दालन (स्टॉल) धारक यांचा अभिप्राय

Image
 महोत्सवातील -दालन (स्टॉल) धारक यांचा अभिप्राय

खाद्य महोत्सवातील -दालन (स्टॉल) धारक यांचा अभिप्राय

Image
  खाद्य महोत्सवातील -दालन (स्टॉल) धारक यांचा अभिप्राय

News Paper Publicity

Image
  Before program

17-2 केंद्र व राज्य शासन कृषी विज्ञान केंद्रास अधिक बळकट करणार : कुलगुरू इंद्र मणी मिश्रा यांचा कृषी महोत्सव समारोपात विश्वास

Image
केंद्र व राज्य शासन कृषी विज्ञान केंद्रास अधिक बळकट करणार : कुलगुरू इंद्र मणी मिश्रा यांचा कृषी महोत्सव समारोपात विश्वास “भारत देश कृषी विकास आणि सुरक्षा यांना समान मानून योजना आखत आहे. ग्रामीण भागात कृषी विषयक गरजा आणि योजनांची अंमलबजावणी करणारी देश व राज्य पातळीवरील सहयोगी संस्था म्हणून कृषी विज्ञान केंद्र ही विकासाचा दुवा ठरत आहे. यातून महिला व पुरुष यातील अंतर कमी होत असून एकसंघ समाज तयार होत आहे”, असे कुलगुरू डॉ. श्री. इंद्र मणी मिश्रा (व.ना.म.कृ.विद्यापीठ, परभणी) यांनी सांगितले. ते संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्र आयोजित रीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. “कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी उच्च ध्येय ठेवून हि संस्था स्थापन केली असून त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत नेणे हे आपले कर्तव्य आहे. या ध्येयाशी बांधील राहून ते राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याची जबाबदारी ही आपण घेऊ आणि अधिक सक्षमपणे कार्य करू”, असेही ते म्हणाले. तर डॉ. राम चव्हाण (व्यवस्थापक, थरमॅक्स ऑनसाईट एनर्जी सोल्युशन, पुणे) यांनी पिकानंतर शेतातील अवशेष ही समस्या ओळखून शेतकऱ्

17-1 ग्रामविकासाची पंचसूत्री : कृषी महोत्सवात मा. भास्कर पेरे पाटील यांचे उपस्थितांना मार्गदर्शन

Image
“स्वच्छ पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, ग्राम स्वच्छता व वयोवृद्धांना आधार” हीच ग्रामविकासाची पंचसूत्री : कृषी महोत्सवात मा. भास्कर पेरे पाटील यांचे उपस्थितांना मार्गदर्शन गावातील व्यक्तींचे आरोग्य जपण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची कामे होणे गरजेचे आहे. त्यात गावातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन जबाबदारी उचलावी. भौतिक सुविधेसोबतच गावात स्वच्छ पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, ग्राम स्वच्छता व वयोवृद्धांना आधार आदी कामे नियमित चालू रहावीत. गावाचा दर्जा तपासण्यासाठी आणि तो उंचावण्यासाठी विविध स्पर्धेत गावाने सहभाग घ्यावा”, असे सल्ला आदर्श ग्राम प्रतिनिधी श्री. भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शेतकरी व परिसरातील ग्रामपंचायत प्रतिनिधींना दिला. ते आज कृषि विज्ञान केद्र आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात बोलत होते. पाटोदा जि. औरंगाबाद येथे सलग २५ वर्षे सरपंच असलेले श्री. भास्कर पेरे यांनी आपल्या गावात ज्या विविध विकासाच्या योजना कार्यान्वित केल्याने शासनाकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले त्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती देऊन गावाने ग्रामपंचायत स्वयंपूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे अस

16 आर्थिकदृष्ट्या सशक्त महिला उन्नत समाज घडवते : कृषि महोत्सवातील महिला मेळाव्यात डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचा आभासी पद्धतीने तर श्रीमती वर्षा ठाकूर यांचा महिलांना कानमंत्र

Image
आर्थिकदृष्ट्या सशक्त महिला उन्नत समाज घडवते : कृषि महोत्सवातील महिला मेळाव्यात डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचा आभासी पद्धतीने तर श्रीमती वर्षा ठाकूर यांचा महिलांना कानमंत्र “महिला या आज शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक सक्षम होत आहेत. पण यापुढे जाऊन महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून बचत गटाच्या माध्यमातून तंत्र उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन जिल्हा परिषद नांदेड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी केले. आज महोत्सवातील दुसऱ्या दिवशी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हातील शेकडो महिलांनी यात उत्फूर्त सहभाग घेतला. बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री. नितीन शर्मा (राज्य प्रकल्प व्यवस्थापक, रिलायन्स फौंडेशन), श्री. चंदनसिंग राठोड (जिल्हा समन्वयक मविम, नांदेड), भारत (अप्पा) पाटील (कोल्हापूर), डॉ. जया बंगाळे (अधिव्याख्यात्या, व.ना.म.कृ.वि. परभणी) सौ. रुपाली शेळके (सरपंच, सगरोळी) व संस्था प्रमुख श्री. प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई ग