16 आर्थिकदृष्ट्या सशक्त महिला उन्नत समाज घडवते : कृषि महोत्सवातील महिला मेळाव्यात डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचा आभासी पद्धतीने तर श्रीमती वर्षा ठाकूर यांचा महिलांना कानमंत्र

आर्थिकदृष्ट्या सशक्त महिला उन्नत समाज घडवते : कृषि महोत्सवातील महिला मेळाव्यात डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचा आभासी पद्धतीने तर श्रीमती वर्षा ठाकूर यांचा महिलांना कानमंत्र


“महिला या आज शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक सक्षम होत आहेत. पण यापुढे जाऊन महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून बचत गटाच्या माध्यमातून तंत्र उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन जिल्हा परिषद नांदेड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी केले. आज महोत्सवातील दुसऱ्या दिवशी महिला
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हातील शेकडो महिलांनी यात उत्फूर्त सहभाग घेतला. बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री. नितीन शर्मा (राज्य प्रकल्प व्यवस्थापक, रिलायन्स फौंडेशन), श्री. चंदनसिंग राठोड (जिल्हा समन्वयक मविम, नांदेड), भारत (अप्पा) पाटील (कोल्हापूर), डॉ. जया बंगाळे (अधिव्याख्यात्या, व.ना.म.कृ.वि. परभणी) सौ. रुपाली शेळके (सरपंच, सगरोळी) व संस्था प्रमुख श्री. प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोह्रे यांनी आभासी पद्धतीने महिलांशी संवाद साधताना “महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना विविध कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. तसेच शेतीमालावर आधारित उद्योग उभारावेत” असे आवाहन केले. तर नितीन शर्मा यांनी “ग्रामीण क्षेत्रामध्ये परिवर्तन आणण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनतर्फे महिलांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक सामाजिक उपक्रम चालू असल्याचे सांगितले”. श्री.चंदनसिंग राठोड यांनी जिल्ह्यामध्ये बचत गटाची साखळी असून 46000 महिला गटाशी जोडलेल्या आहेत. लघु उद्योगातून महिलांनी समृद्धी आणावी. महिला आर्थिक विकास महामंडळ सहकार्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. कोल्हापूरच्या भारत (अप्पा) पाटील यांनी, स्त्रीनेच स्त्री जातीचा सन्मान करावा, "लेक वाचली पाहिजे" हे अभियान महिलांनी चालविले पाहिजे. कुटुंबातील एखादी महिला जागृत झाल्यास संपूर्ण कुटुंब, समाज जागृत होतो असे सांगितले. प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी, पाल्याची यशस्वीता व पालकांची भूमिका याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
महिलांचे आरोग्य जपण्यासाठी या मेळाव्यास जोडूनच आरोग्य विभागातर्फे हिमोग्लोबिन तपासणी व औषधांचे वाटप करण्यात आले. ३०० हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला. #womenpower #womenshealth #womeninbusiness #womenownedbusiness #shggroup #krushived2023 #kvksagroli #nandednews #agricultureeducation #climatechange #ClimateSmartAgriculture








Comments

Popular posts from this blog