17-2 केंद्र व राज्य शासन कृषी विज्ञान केंद्रास अधिक बळकट करणार : कुलगुरू इंद्र मणी मिश्रा यांचा कृषी महोत्सव समारोपात विश्वास

केंद्र व राज्य शासन कृषी विज्ञान केंद्रास अधिक बळकट करणार : कुलगुरू इंद्र मणी मिश्रा यांचा कृषी महोत्सव समारोपात विश्वास

“भारत देश कृषी विकास आणि सुरक्षा यांना समान मानून योजना आखत आहे. ग्रामीण भागात कृषी विषयक गरजा आणि योजनांची अंमलबजावणी करणारी देश व राज्य पातळीवरील सहयोगी संस्था म्हणून कृषी विज्ञान केंद्र ही विकासाचा दुवा ठरत आहे. यातून महिला व पुरुष यातील अंतर कमी होत असून एकसंघ समाज तयार होत आहे”, असे कुलगुरू डॉ. श्री. इंद्र मणी मिश्रा (व.ना.म.कृ.विद्यापीठ, परभणी) यांनी सांगितले. ते संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्र आयोजित रीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.
“कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी उच्च ध्येय ठेवून हि संस्था स्थापन केली असून त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत नेणे हे आपले कर्तव्य आहे. या ध्येयाशी बांधील राहून ते राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याची जबाबदारी ही आपण घेऊ आणि अधिक सक्षमपणे कार्य करू”, असेही ते म्हणाले. तर डॉ. राम चव्हाण (व्यवस्थापक, थरमॅक्स ऑनसाईट एनर्जी सोल्युशन, पुणे) यांनी पिकानंतर शेतातील अवशेष ही समस्या ओळखून शेतकऱ्यांनी यावर आधारित उद्योग सुरु करावेत याविषयी माहिती दिली. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, यशस्वी शेतकरी, प्रतिष्ठान प्रतिनिधी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या माहितीविषयक घडी पत्रिकांचे प्रकाशनही करण्यात आले. केव्हीके प्रमुख डॉ. सौ. माधुरी रेवणवार व समन्वयक श्री. व्यंकट शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तीनही दिवस सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था व व्यक्ती या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. #NABARD #KrushiVed2023 #kvksagroli #nanded #agriculture #rural #SHG #climatechange #vnmkvparbhani #ClimateSmartAgriculture








Comments

Popular posts from this blog