17-1 ग्रामविकासाची पंचसूत्री : कृषी महोत्सवात मा. भास्कर पेरे पाटील यांचे उपस्थितांना मार्गदर्शन

“स्वच्छ पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, ग्राम स्वच्छता व वयोवृद्धांना आधार” हीच ग्रामविकासाची पंचसूत्री : कृषी महोत्सवात मा. भास्कर पेरे पाटील यांचे उपस्थितांना मार्गदर्शन


गावातील व्यक्तींचे आरोग्य जपण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची कामे होणे गरजेचे आहे. त्यात गावातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन जबाबदारी उचलावी. भौतिक सुविधेसोबतच गावात स्वच्छ पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, ग्राम स्वच्छता व वयोवृद्धांना आधार आदी कामे नियमित चालू रहावीत. गावाचा दर्जा तपासण्यासाठी आणि तो
उंचावण्यासाठी विविध स्पर्धेत गावाने सहभाग घ्यावा”, असे सल्ला आदर्श ग्राम प्रतिनिधी श्री. भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शेतकरी व परिसरातील ग्रामपंचायत प्रतिनिधींना दिला. ते आज कृषि विज्ञान केद्र आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात बोलत होते.
पाटोदा जि. औरंगाबाद येथे सलग २५ वर्षे सरपंच असलेले श्री. भास्कर पेरे यांनी आपल्या गावात ज्या विविध विकासाच्या योजना कार्यान्वित केल्याने शासनाकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले त्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती देऊन गावाने ग्रामपंचायत स्वयंपूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. शासनाचे अनुदान तर मिळतेच पण याचा लाभ गावाला होईल अशी खात्री नसल्याने नागरिक कायम समाधानी असतात. पण गावाचा विकास लोकांनीच पुढे येऊन करावा असे ते बोलले. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केले.
संस्था कुटुंबप्रमुख श्री. प्रमोद देशमुख यांनी युवा पिढीने गावाच्या विकास कार्यात पुढाकार घेऊन हा विकासाचा रथ अधिक गतीने पुढे न्यावा असे सूचित केले.
#NABARD #KrushiVed2023 #kvksagroli #nanded #agriculture #rural #SHG #climatechange #भास्कर #पेरे #BHASKAR #PERE #PATIL #पाटील #ClimateSmartAgriculture #ClimateSmartAgriculture #krushived2023 Narendra Modi U.S. Consulate General Mumbai










Comments

Popular posts from this blog