Popular posts from this blog
16 आर्थिकदृष्ट्या सशक्त महिला उन्नत समाज घडवते : कृषि महोत्सवातील महिला मेळाव्यात डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचा आभासी पद्धतीने तर श्रीमती वर्षा ठाकूर यांचा महिलांना कानमंत्र
आर्थिकदृष्ट्या सशक्त महिला उन्नत समाज घडवते : कृषि महोत्सवातील महिला मेळाव्यात डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचा आभासी पद्धतीने तर श्रीमती वर्षा ठाकूर यांचा महिलांना कानमंत्र “महिला या आज शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक सक्षम होत आहेत. पण यापुढे जाऊन महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून बचत गटाच्या माध्यमातून तंत्र उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन जिल्हा परिषद नांदेड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी केले. आज महोत्सवातील दुसऱ्या दिवशी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हातील शेकडो महिलांनी यात उत्फूर्त सहभाग घेतला. बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री. नितीन शर्मा (राज्य प्रकल्प व्यवस्थापक, रिलायन्स फौंडेशन), श्री. चंदनसिंग राठोड (जिल्हा समन्वयक मविम, नांदेड), भारत (अप्पा) पाटील (कोल्हापूर), डॉ. जया बंगाळे (अधिव्याख्यात्या, व.ना.म.कृ.वि. परभणी) सौ. रुपाली शेळके (सरपंच, सगरोळी) व संस्था प्रमुख श्री. प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई ग...
17-2 केंद्र व राज्य शासन कृषी विज्ञान केंद्रास अधिक बळकट करणार : कुलगुरू इंद्र मणी मिश्रा यांचा कृषी महोत्सव समारोपात विश्वास
केंद्र व राज्य शासन कृषी विज्ञान केंद्रास अधिक बळकट करणार : कुलगुरू इंद्र मणी मिश्रा यांचा कृषी महोत्सव समारोपात विश्वास “भारत देश कृषी विकास आणि सुरक्षा यांना समान मानून योजना आखत आहे. ग्रामीण भागात कृषी विषयक गरजा आणि योजनांची अंमलबजावणी करणारी देश व राज्य पातळीवरील सहयोगी संस्था म्हणून कृषी विज्ञान केंद्र ही विकासाचा दुवा ठरत आहे. यातून महिला व पुरुष यातील अंतर कमी होत असून एकसंघ समाज तयार होत आहे”, असे कुलगुरू डॉ. श्री. इंद्र मणी मिश्रा (व.ना.म.कृ.विद्यापीठ, परभणी) यांनी सांगितले. ते संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्र आयोजित रीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. “कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी उच्च ध्येय ठेवून हि संस्था स्थापन केली असून त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत नेणे हे आपले कर्तव्य आहे. या ध्येयाशी बांधील राहून ते राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याची जबाबदारी ही आपण घेऊ आणि अधिक सक्षमपणे कार्य करू”, असेही ते म्हणाले. तर डॉ. राम चव्हाण (व्यवस्थापक, थरमॅक्स ऑनसाईट एनर्जी सोल्युशन, पुणे) यांनी पिकानंतर शेतातील अवशेष ही समस्या ओळखून शेतकऱ्...

















Comments
Post a Comment